भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पेंढरी ते तिरखुरी या मार्गावरील पुलाच्या टोकाशी निर्माण झालेला मोठा खड्डा हा नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा ठरत आहे. गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर पूल बांधण्यात आला असून पुलानंतरच्या रस्त्याला केवळ मुरूमकाम करण्यात आले आहे. मात्र, डांबरीकरणाचा अभाव आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे या ठिकाणी चिखल व पाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे.