जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या गोजोरा - कंडारी मार्गावरील वराडसीम गावाजवळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर डबके साचले असून चिखलामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोकाही वाढला असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.