आदिवासींना आरोग्य, शिक्षण आणि प्रयोगातून स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. लोकनेते दाजीसाहेब पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.