नांदगाव पेठ परिसरात अवैधरीत्या एलपीजी गॅस सिलेंडर साठवून मशीनद्वारे रिफिलींग करून विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला. तपासणीदरम्यान आरोपी साबिर लष्कर हासिम लष्कर (वय ४०, रा. शासकीय वसाहत, नांदगाव पेठ, अमरावती) हा अवैधरीत्या गॅस सिलेंडर साठवून त्याचे रिफिलींग करत असल्याचे आढळले. पंचनाम्यात ५८ गॅस सिलेंडर, तीन रिफिलीं