राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकता संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसरऱ्या दिवशी मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हरतालिका असल्यामुळे उपोषणात बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळीच हरतालिका पूजन केले. यावेळी त्यांनी भगवान भोलेनाथ आणि गणरायाला आपल्या मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी साकडे घातले.