लहान बालकात धम्म संस्कार रुजविण्याचे हेतूने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा कोरची यांच्या पुढाकाराने निर्मल हॉटेल कोरची येथे दिनांक ५ जून ते ७ जून पर्यंत होणाऱ्या तीन दिवसीय बाल धम्म संस्कार शिबिराचे उद्घाटन आज दि.५ जून गूरूवार रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाले. बाल धम्मसंस्कार शिबिराचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा कोरची चे प्रवक्ते डॉ.विनोद चहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संस्कार प्रमूख काका गडकरी यांचा हस्ते संपन्न झाले.