मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ द्यावा ही मागणी केली सरकारने काही मागण्या मान्य केल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याने साकोली येथील ओबीसी समाज बांधवांनी साकोली येथील विश्रामगृहात सोमवार दि.8 सप्टेंबरला सकाळी8 वाजता सभेचे आयोजन केले. खेमचंद कावळे राधेश्याम मुंगमोडे रवी परशुरामकर मनीष कापगते व समाज बांधव उपस्थित होते मंगळवार दि9 सप्टेंबरला दुपारी12वाजता लहरीबाबा मठातून येथून भव्य आरक्षण बचाव रँलीचे आयोजन करण्यात येणार आहे.