श्रीगोंदा पोलिसांचा धडाकेबाज रूट मार्च – विसर्जन मिरवणुकीसाठी लोहमोर्चा सज्ज श्रीगोंदा (प्रतिनिधी) – गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद सण शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी आज धडाकेबाज रूट मार्च आज दुपारी बारा काढला. शहर व तालुक्यातील नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देताच, कायदा मोडणाऱ्यांना इशारा देण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.