जळगावात गणेश विसर्जन नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मनपा सभागृहाची किल्ली वेळेवर न मिळाल्याने गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तब्बल अर्धा तास पदाधिकारी सभागृहाबाहेर ताटकळत उभे होते, तर दुसरीकडे मनपाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने गणेश महामंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.