मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मौदानावर उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातुन मराठा बांधवांसह इतर समाजाचा ही पाठींबा मिळत आहे. या पार्श्वभुमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी सोमवारी (ता.1) काटशेवरी फाटा येथे सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो मराठा बांधवांनी सहभागी होत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.