बदलापूर येथील कात्रप परिसरामध्ये आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास नगर परिषदेकडून अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक झाड पडलं होतं व ते झाड एका वखारीवर पडल होत. त्यामुळे वखारीचा मोठा नुकसान झालं होतं. सध्या ही जागा नगरपरिषदेच्या हद्दीत येत असून या सर्व वखारी अनाधिकृतपणे बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे नगरपरिषदेने त्या ठिकाणी आज तोडक कारवाई केली आहे.