गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावात सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्या वतीने विजयादशमीचा भव्य सोहळा पारंपरिक उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील भव्य पटांगणावर तसेच गावातील मुख्य दुर्गा चौकात तब्बल ४० फुट रावण दहन करण्यात आले.