स्वखर्चातून रस्ते-दुरुस्ती अभियानाची सुरुवात माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशीचे विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती स्वखर्चातून करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या निधीतून ते शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करून देत आहेत.