आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी ७.३० च्या सुमारास मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. म्हणूनच विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली होती. या समितीमार्फत चर्चा करून सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठा आंदोलकांची मागणी आम्ही मान्य केली आहे.