पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राइव्हची घटना समोर आली आहे. मद्यधुंद डंपर चालकानं दुचाकीस्वार महिलेला धडक दिली आहे. हा डंपर पुणे महानगर पालिकेच्या असून त्यावरील चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पहायला मिळाले. महिलेच्या दुचाकीला धडक दिली. मनपाकडून या चालकावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. सोशल माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.