Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
मनोज पाटील जरांगे यांचे मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे.दरम्यान त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले आहे तिथे मराठा बांधवांची जेवणाची गैरसोय होत असल्याची बाब समोर आली याच अनुषंगाने वैजापूर शहरातील सकल मराठा समाजाकडून मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेल्या मराठा बांधवांसाठी जेवणासाठी चटणी, व लोणचे यासोबतच यंत्राद्वारे पोळ्या बनवून त्या रविवारी मुंबईला सकाळी रवाना होणार आहेत.