उदगीर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात उदगीर तालुका सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली,मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू करणार आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी उदगीर तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन जास्तीत जास्त मराठा बांधवानी मुंबईला जाण्यासाठी आपापल्या गावात समाज बांधवांना मुंबईला जाण्यासाठी आवाहन करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.