10 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे 100% समायोजन व प्रत्येक वर्षी 30 टक्के प्रमाणे, सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये काढण्याबाबत, राष्ट्रीय आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी एकत्रिकरण समिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने, जिल्हा परिषद समोर बेमुदत संप सुरू असून, आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.