दोन दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यामुळे सातारा शहर खड्डे मुक्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, सातारा शहरातील प्रमुख मार्गावरून गणपतीचे मिरवणूक काढण्यात येतात मात्र सध्या अति पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेने तातडीने हे खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.