राज्य सरकारमध्ये दोन गटांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जीआर मला दाखवला नाही, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी आज दुपारी सव्वा एक वाजता केले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला छगन भुजबळ यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकींदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.