गोहत्येच्या उद्देशाने बैलांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरोपी मनोज मंगेश सावंत यांचा बैल ताब्यात देण्याचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने बैलांचा ताबा ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेकडेच ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर आरोपीला प्रत्येक बैलासाठी दरमहा ३ हजार रुपये (चारा-पाणी) खर्च देण्याचेही न्यायालयाने बजावले आहे. बजरंग दल आणि ध्यान फाउंडेशनच्या गोरक्षण कार्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे. अशी माहिती ॲड. पलाश चव्हाण यांनी दिली.