ठाण्यातील राम मारुती रोडवरील हॉटेल शिवप्रसाद समोर उभ्या असलेल्या एका गाडीमधून सुमारे ७ लाख रुपयांची रोकड आणि एक लॅपटॉप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना आज १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास समोर आली. गाडी चालकास एका अज्ञात व्यक्तीने गाडीचे टायर पंक्चर झाल्याचे किंवा पैसे पडल्याचे सांगितले. चालक गाडीतून खाली उतरून तपासणीसाठी गेला असताना, दुसऱ्या चोरट्याने गाडीच्या मागील बाजूने दरवाजा उघडून बॅग आणि लॅपटॉप लंपास केली.