सातारा शहरातील विसर्जन मार्गावर तब्बल आठ इमारती अति धोकादायक अवस्थेत उभे असून, डीजेच्या दणक्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने अशा इमारतींवर, सूचना फलक लावून सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची आवहान केले असल्याचे पालिका प्रशासनाकडून आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सांगण्यात आले. सातारा शहरातील विसर्जन मार्गावर आठ इमारती या धोकादायक रित्या असून त्यांना डॉल्बीच्या आवाजाचा हादरा बसू शकतो.