आगामी सन आणि उत्सव विचारात घेऊन कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना जिल्हा पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सुमारे 472 जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याची माहिती गुरुवार दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. गणेशोत्सव आणि इद ए मिलाद हे सण जालना जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण अथवा बाधा येऊ नये यासाठी पोलीसांनी कारवाई केली.पोलीस अधिक्षक अजय कुमार याचे आदेश होते.