कन्नड येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी आज दि २२ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता तहसीलदारांकडे स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्याचे दोन टप्यात वाटप करण्याची मागणी केली आहे. पहिल्या टप्यात भुमीहीनांना, तर दुसऱ्या टप्यात नोकरदार व बागायतदारांना धान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच दुकानदारांकडे उरलेले शिल्लक धान्य नागरिकांना देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.