बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज 26 ऑगस्ट रोजी 43 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत