आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावरील फलकाला काळी शाही लावण्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर मोर्चा काढला. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान तिथे भाजपाचे कार्यकर्ते देखील आले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली