जळगावमध्ये आरोग्य आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रविवारी ३१ ऑगस्ट रोजी 'वाल्काथॉन' आणि 'सायक्लोथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथून झाली. जळगाव शहरवासीयांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला. एकूण ५५० हून अधिक जणांनी यात सक्रिय सहभाग घेतला.