नालासोपारा येथे एका गादीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली काही. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, आणि आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे. गादीचे दुकान व दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.