दि. १२ सप्टेंबर, रोज शुक्रवार 12.00 वाजे राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिला समुपदेशन केंद्राला शैक्षणिक अभ्यास भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेतला. समाजातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर केंद्रात दिली जाणारी समुपदेशन व कायदेशीर मदत याबाबत विद्यार्थ्यांनी थेट माहिती घेतली. या अभ्यास भेटीच्या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षस्थानी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, उपस्थित होते.