छत्रपती संभाजीनगर येथील उप आयुक्त नवनित कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश गृह विभागान शनिवार दि.21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता, निर्गमित केले आहेत. नवनित कावत मूळचे राजस्थानचे आहेत. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्ट के