नंदुरबार शहरातील मिशन हायस्कूलच्या प्रांगणात आज दुपारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील उपसरपंच डॉ मनोज गिरासे उपस्थित होते.