दि.19 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास पुरगाव येथे फिर्यादी अंकित मसे हा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला असता वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी संगम नेवारे हजर होता.यावेळी आरोपीने फिर्यादीस तू मला दारू पाज तेव्हा फिर्यादीने म्हटले,मी दारू पीत नाही व कोणाला पाजत नाही.असे बोलले असता आरोपीने तू मला दारू का पाजत नाही असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ करून भांडण करून रोडवर असलेल्या विटेने डोक्यावर मारून दुखापत केले.फिर्यादीच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.