गणेशोत्सवाच्या पर्वावर बुधवार दि. 27 ऑगस्टला सकाळीपासून ते सायंकाळपर्यंत रामटेक शहरात गणेश भक्तांची लगबग दिसून आली. शहराच्या शनिवारी वार्डातील कुंभारपुऱ्यात सकाळपासूनच गणेश मूर्ती विकत घेणाऱ्यांची गर्दी दिसून आली. बहुतेकांनी आदल्या दिवशीच अर्थात मंगळवारला गणेश मूर्ती घरी नेल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. बुधवारला सकाळपासूनच काहींनी चार चाकी, दुचाकी, सायकल, ऑटो ने मुर्त्या घरी नेल्या. गणेश उत्सवा निमित्ताने रामटेक शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.