आज दिनांक 7 सप्टेंबरला नेर शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.ठाणेदार अनिल बेहराणी यांनी केलेल्या आव्हानानुसार अनेक गणेश मंडळांनी काढलेल्या मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर केला.गणपती विसर्जन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये तालुक्यातील पोलीस पाटील,निवृत्त पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधवांचा सुद्धा समावेश आहे...