फिर्यादी दिलीप रुद्रावार यांच्या तक्राईनुसार 30 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता च्या सुमारास फिर्यादी हा पत्नी रुशाली रुद्रावार यांच्यासोबत दुचाकीने जात असताना अज्ञात इसमाने त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी होऊन मरण पावली.या प्रकरणी सात ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे चार वाजता च्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.