पारवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आशिष मिश्रा असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयीन उपचार सुरू होता मात्र त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला या घटनेने पोलीस दलामध्ये शोककळा पसरली आहे.