मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या विजयी उमेदवारांनी आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी खासदार संजय राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब उपस्थित होते.