जळगाव शहरात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या एका दुचाकीस्वाराने दोन मित्रांना गंभीर जखमी करून पळ काढल्याची घटना रविवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता गोदावरी इंजिनिरिंग कॉलेज समोर घडली आहे. याप्रकरणी सोमवारी 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.