लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील गावात डेंग्यूने थैमान घातले असतानाच अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या सिरोंचा तालुक्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लंबडपल्ली, पेंट्टीपाका, तुमनूर, अंकिसा या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवीत वेळीच उपाययोजना सुरू केल्याने डेंग्यू रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.