किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळविण्यासाठी कंत्राटी कामगारांनी काम बंदचा पवित्रा घेतल्याने आज २८ सप्टेंबर तिसऱ्या दिवशीही काम बंद राहिल्याने कोपरगाव शहरात कचरा कचरा साचल्याचे चित्र आहे.एकीकडे नगरपालिका मोठमोठे फ्लेक्स लावून ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जनजागृती करते, मात्र प्रत्यक्षात घंटा गाड्या बंद असल्याने जनजागृती ही केवळ नावालाच असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.