घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील वैभव नगर येथे 22 ऑगस्टला रात्री आठ वाजता उघडकीस आली याप्रकरणी 23 ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.