धुळे शहरातील साने गुरुजी चौकात एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून काही तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत वैभव मंचरे आणि रोहन बडगुजर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.