मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथे रविवारी दुपारी १२ वाजता मोहोळचे आमदार राजू खरे व राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवक्ते उमेश पाटील यांनी पाहणी दौरा केला. यावेळी मोहोळचे तहसीलदार, सावळेश्वरचे मंडल अधिकारी, शिरापूरचे तलाठी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या नियमानुसार ६५ मिमी पाऊस पडल्यावरच पंचनामे करण्याचा जीआर आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन आमदार खरे आणि उमेश पाटील यांनी सरसकट पंचनामे करण्याचे तोंडी आदेश तहसीलदारांना दिले.