धुळे मनपा रोडवर भाजप महिला मोर्चातर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा काँग्रेसकडून वारंवार अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. “जो स्वतःच्या आईचा मान राखत नाही, तो इतरांचा काय मान ठेवणार?” असा सवाल करत राहुल गांधींच्या बिहारमधील वक्तव्य आणि AI व्हिडिओचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा आरती पवार यांनी केले.