पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान परदेश दौरे करतात आणि परदेशी नेते भारताला भेट देतात. जपानसोबतचे आमचे संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत. आम्हाला आशा आहे की जपानसोबतचा व्यापार आणखी वाढेल. जपानी उत्पादने भारतात चांगली विकली जातात आणि भारतीय उत्पादने जपानमध्ये चांगली विक्री करतात.