आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दुबई येथे मॅच होत आहे. दरम्यान ही भारत पाकिस्तान अशी मॅच आहे, तर पाकिस्तान भाजपची मॅच आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. खालच्या भाषेत त्यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत शरद कोळी यांनी आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.