आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनरचे तीन दिवशीय प्रशिक्षण कालपासून सुरू झाले. सेमाना रोडवरील एकलव्य मॉडेल रेसीडेन्शियल स्कूल येथे प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते तर अहेरी येथे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.