वैराग शहरात चोरीच्या घटना थांबता थांबेना झाल्या असून, चोरांना आता कायद्याचे भय उरले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चक्क पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छ. शिवाजी महाराज चौकातील तांबोळी पान शॉप हे चोरट्यांनी फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना २५ रोजी सकाळी ९च्या सुमारास उघडकीस आली आहे.