गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे नागरिक तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता, आज मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. दि. ०२ सप्टेंबर २०२५ (५ दिवसांचे विसर्जन) आणि दि. ०६ सप्टेंबर २०२५ (११ दिवस-अनंत चतुर्दशी) रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.